ठाणे- भिवंडी तालुक्यातील पडघा जवळच्या खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमातील तब्बल 69 वृद्धांना कोरोनाची लागण ( Corona ) झाल्याने खळबळ उडाली असून या सर्व वृद्धांना ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Corona Update : मातोश्री वृद्धाश्रमातील 69 वृद्धांना कोरोनाची लागण
भिवंडी तालुक्यातील पडघा जवळच्या खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमातील तब्बल 69 वृद्धांना कोरोनाची लागण ( Corona ) झाल्याने खळबळ उडाली असून या सर्व वृद्धांना ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील खडवली येथे नदीकिनारी मातोश्री वृद्धाश्रम असून त्या ठिकाणी सुमारे शंभरहुन अधिक व्याधीग्रस्त वयोवृद्ध वास्तव्यास आहेत. जिल्ह्यात विशेतः भिवंडी शहर ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात आला असतानाच मागील आठवड्यात या आश्रमातील काही जणांना ताप जाणवू लागल्याने उपचार सुरू केले. मात्र, ही एका वृद्धाचा ताप कमी न झाल्याने त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खबरदारी म्हणून वृद्धाश्रम व्यवस्थापनाने सर्वांचीच चाचणी केली असता त्यापैकी तब्बल 69 वृद्धांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्या सर्वांना उपचारासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची महिती वृद्धाश्रम व्यवस्थापक अशोक पाटील यांनी दिली आहे.
हे ही वाचा -Omicron Variant : जाणून घ्या ओमिक्रॉन व्हॅरिएन्टविषयीची माहिती, एका क्लिकवर