ठाणे -आईसोबत रस्त्याने पायी चालणाऱ्या चिमुरड्याला भिवंडी महापालिकेच्या भरधाव घंटागाडीने चिरडल्याची धक्कादायक घटना भिवंडी शहरात घडली आहे. या अपघातात सहा वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला असून ही घटना भिवंडीतील सलामतपुर परिसरात घडली आहे. रोहित विजय लोंढे (वय.६ रा.कोंडाजीवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे.
भिवंडीत आईसोबत रस्त्याने चाललेल्या ६ वर्षीय चिमुरड्य़ाला भरधाव घंटागाडीने चिरडले - bhiwandi-municipal
मृत रोहित आईसोबत बुधवारी सकाळच्या सुमाराला रस्त्याने पायी निघाला होता. त्यावेळी नागांव रोड, गॅलेक्सी टॉकीजसमोर भरधाव आलेल्या घंटागाडीची रोहितला जोरदार धडक बसली. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. यावेळी जमावाने चालकाला बेदम चोप देत, पोलिसांच्या हवाली केले. या अपघाताचा शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत रोहित आईसोबत बुधवारी सकाळच्या सुमाराला रस्त्याने पायी निघाला होता. त्यावेळी नागांव रोड, गॅलेक्सी टॉकीजसमोर भरधाव आलेल्या घंटागाडीची रोहितला जोरदार धडक बसली. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. यावेळी जमावाने चालकाला बेदम चोप देत, पोलिसांच्या हवाली केले. या अपघाताचा शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक सचिन रुपसेन गोसावी (वय. २५ रा. अत्तार पाडा, शेलार ) याला एपीआय दुर्गेश दुबे यांनी अटक केले आहे.
खळबळजनक बाब म्हणजे अटकेत असलेला चालक सचिन याच्याकडे घंटागाडी चालविण्याचा परवाना नसल्याचे समोर आहे. यामुळे महापालिका शहरातील कचरा उचल्यासाठी विनापरवाना घंटागाड्यांचा उपयोग करते का ? असा प्रश्न या अपघातामुळे उपस्थित झाला आहे.