महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीत नवे पाच कोरोनाबाधित रुग्ण; शहर व ग्रामीणचा आकडा 53 वर - भिवंडी कोरोना अपडेट

भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण बाधित रुग्णांचा आकडा 53 वर पोहचला असून त्यापैकी 13 जण बरे झाले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे.

भिवंडी
भिवंडी

By

Published : May 12, 2020, 11:46 AM IST

ठाणे- भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून सोमवारी शहरात 2 तर ग्रामीण भागात 3 अशा 5 नव्या रुग्णांची वाढ झाली. यामुळे भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण बाधित रुग्णांचा आकडा 53 वर पोहचला असून त्यापैकी 13 जण बरे झाले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे.

भिवंडी शहरातील एकूण बाधित रुग्णांचा आकडा 27 वर पोहचला असून शहरात आतापर्यंत चार रुग्ण बरे झाले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण भिवंडी भागात काल्हेर येथे दोन व राहनाळ येथे एक अशा तीन नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचा एकूण आकडा 26 वर पोहचला असून ग्रामीण भागातील 9 रुग्ण बरे झाले आहेत.

शहरात सोमवारी दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. एक रुग्ण हे 39 वर्षीय पुरुष असून ते इंदोर येथून आले असून ते आजादनगर येथील रहिवासी आहेत. तर दुसरा रुग्ण 39 वर्षीय महिला असून त्या वरळी मुंबई येथून आलेल्या असून त्या ब्रह्मानंदनगर कामतघर येथील रहिवासी आहेत. दोन्ही रुग्णांच्या कुटुंबीयांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

तर भिवंडी ग्रामीण भागात काल्हेर येथे दोन आणि राहनाळ येथे एक असे तीन नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांनी दिली. त्यामुळे ग्रामीण भागातील बाधित रुग्णांचा आकडा 26 वर पोहचला असून 9 जण बरे झाले आहेत. तर भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण बाधित रुग्णांचा आकडा 53 वर पोहचला असून त्यापैकी 13 जण बरे झाले आहेत, तर एकाच मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details