ठाणे - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात गुरुवारी 413 नवीन बाधितांची नोंद करण्यात आली. तसेच 340 जणांनी कोरोनावर मात केली. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी 400 बाधितांची नोंद करण्यात आली होती. ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 62 हजार 398 वर पोहोचली आहे. तर एकूण 1 हजार 774 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत 37 हजार 374 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत मनपा क्षेत्रातील मृतांची 523 वर गेली आहे.
ठाण्याच्या नऊ प्रभाग समितीत गुरुवारी आढळलेली रुग्णसंख्या -
- माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीत - 83; बुधवारच्या तुलनेत 3 रुग्णांची वाढ
- वर्तकनगर प्रभाग समिती - 48
- लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समिती - 51
- नौपाडा-कोपरी प्रभाग समिती - 66
- उठलसार प्रभाग समितीत 54; बुधवारच्या तुलनेत 9 रुग्णांची वाढ
- वागळे प्रभाग समिती - 23; बुधवारच्या तुलनेत 9 रुग्णांची वाढ
- कळवा प्रभाग समिती - 63; बुधवारच्या तुलनेत 9 रुग्णांची वाढ
- मुंब्रा प्रभाग समितीत - 6; बुधवारच्या तुलनेत 9 रुग्णांची घट
- दिवा - 16; 5 रुग्णांची घट झाली आहे.
- प्रत्यक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 6 हजार 28
- बरे झालेल्यांची संख्या 8 हजार 281
दरम्यान, कल्याण-डोंबवली पालिकेच्या हद्दीतील बाधितांची संख्या 6 हजार 208 आहे. तर आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 8 हजार 165 आहे. याठिकाणी आतापर्यंत 225 बाधितांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबई पालिका हद्दीतील रुग्णांची संख्या 3 हजार 704 इतकी आहे. तर 6 हजार 520 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याठिकाणी 322 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मीरा-भायंदर पालिकेतील कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 217 आहे. बरे झालेल्यांची संख्या 4 हजार 645 रुग्ण आहेत. तर 213 बाधितांचा मृत्यू झाला आहे.