ठाणे -भिवंडीमध्ये सात वर्षीय शाळकरी मुलीवर अमानूष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अवघ्या दहा तासात अटक केली. पोलिसांनी आरोपीला सोमवारी दुपारी जिल्हासत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 जानेवारीपर्यंत 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. भरतकुमार धनीराम कोरी (वय- 30) असे आरोपीचे नाव आहे, तर पीडितेच्या आईने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा -प्लास्टिकच्या गोणीत मृतदेह सापडलेल्या 'त्या' मुलाची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक
नराधम भरतकुमार याने भिवंडी तालुक्यातील एका गावात सात वर्षीय मुलगी घराबाहेर खेळत असताना शनिवारी रात्रीच्या सुमाराला अपहरण करून तीच्यावर अत्याचार केला. त्यानंतर झुडपात नेवून तिची दगडाने ठेचून हत्या केली व फरार झाला. रविवारी सकाळी 6 च्या सुमारास तेथील झुडपात शौचास गेलेल्या एका व्यक्तीस तीचा मृतदेह आढळून आल्याने त्याने आरडाओरड करीत ही घटना पीडितेच्या कुटुंबीयांना सांगितली.
भोईवाडा पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून तातडीने अटक केली व न्यायालयात हजर केले.
हेही वाचा -चिखलीत खेळताना दोरीचा फास लागल्याने चिमुकलीचा मृत्यू