ठाणे- भिवंडी तालुक्यात असलेल्या हिवाळी गावातील एकाविधवा आदिवासी महिलेच्या घरात रात्रीच्या वेळी घुसून तिचा एका नराधमाने विनयभंग केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी ठाणे जिल्हा सत्र व विशेषन्यायालयाने या नराधमाला दोषी ठरवतविनयभंग वअॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. प्रकाश अंधेरे (४२) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना २००८ ला गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.
आदिवासी महिलेचा विनयभंग करणाऱ्याला ३ वर्षांचा कारावास - कारावास
भिवंडी तालुक्यात असलेल्या हिवाळी गावातील एका विधवा आदिवासी महिलेच्या घरात रात्रीच्या वेळी घुसून तिचा एका नराधमाने विनयभंग केल्याची घटना घडली होती.
१९ ऑक्टोबर २००८ रोजी मध्यरात्री आरोपी प्रकाश महिलेच्या घरात शिरून त्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडिता तिच्या मुलांसोबत झोपलेली होती. अचानक घडलेल्या प्रसंगाने तिने आरडाओरड केल्याने आरोपीने घरातून पळ काढला होता. त्यावेळी पिडीतमहिला आणि तिच्या मुलाने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र,तो त्यांच्या हातातूननिसटला. याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावा संकलित करून न्यायालयातदोषारोपपत्रदाखल केले होते. हा खटला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. पी. शिरसाठ यांच्या न्यायालयात चालवण्यात आला.
सरकारीवकील रेखा हिरावळे यांनी सादर केलेल्या पाच साक्षीदारांची साक्ष तसेच पोलिसांनी सादर केलेलेपुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने प्रकाश अंधेरे याला दोषी ठरलवून शिक्षा ठोठावली आहे. यामध्ये अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार ३ वर्षे कारावास व एक हजार रुपये दंड, विनयभंगप्रकरणी १ वर्ष कारावास आणि कलम ४५२ प्रकरणी ६ महिने कारावास आणि १ हजार रुपये दंड, अशा वेगवेगळ्या कलमान्वये शिक्षांचा समावेश आहे. या गुन्ह्याचा तपास गणेशपुरी विभागाचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी एच.ए. आव्हाड यांनी केला.