मीरा भाईंदर (ठाणे) - मीरा भाईंदरमध्ये आज (मंगळवार) एकाच दिवशी कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५० जणांची कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे १५० नवीन रुग्णांची भर पडली आहे. तसेच ८८ जणांनी आज कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मीरा भाईंदर शहर कोरोनाच्या विळख्यात अडकल्याचे दिसत असून असून दिवसेगणिक कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने मागील पाच दिवसात 'चेस द व्हायरस" या मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन तपासणी केली. या मध्ये ५५ नवे रुग्ण आढळून आले. मीरा भाईंदर शहरात आज ४ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची एकूण संख्या २३३ झाली आहे. तर शहरातील कोरोना मुक्तांची संख्या समाधानकारक आहे. एकूण ५२४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णामध्ये ६८ नवीन तर ८२ जणांना कोरोनाबधितांच्या संपर्कामुळे लागण झाली आहे.