नवी मुंबई - पनवेल महापालिका क्षेत्रात शुक्रवारी (15 मे) 15 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. महापालिका क्षेत्रात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामोठ्यातील 8, खारघरमधील 3, कळंबोलीतील 3, खांदा कॉलनी मधील 1 व तक्का येथील 1, असे मिळून 15 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 234 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांपैकी 100 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारीही कामोठेमधील 2 व नवीन पनवेलमधील 2 रुग्णांची कोरोनाची अंतिम चाचणी निगेटिव्ह आल्याने घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाच्या 127 जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत.
कामोठ्यात कोरोनाचा ८ नवे रुग्ण -
कामोठ्यातील सेक्टर 35 मधील 2 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्तींच्या कुटुंबातील एक महिला मुंबई महापालिकेत लिपिक म्हणून कार्यरत असून याआधीच कोरोना पॉझिटिव्ह आली होती. या महिलेपासून या दोघांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच कामोठे, सेक्टर-10 मधील 54 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली असून, ही व्यक्ती मुंबई महापालिकेच्या घाटकोपर येथील कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे.
सेक्टर-22 मधील, 31 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला नवीन पनवेल येथील रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी वारंवार जात होती. त्यामुळे तिला रुग्णालयात संसर्ग झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच सेक्टर-11 मधील 57 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती मुंबईत बेस्ट डेपोमध्ये कॅशियर म्हणून कार्यरत आहे. कामोठे येथील एका रुग्णालयात 24 वर्षीय व्यक्ती आलेली आहे. या व्यक्तीला त्या रुग्णालयामधून संसर्ग झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच कामोठे, सेक्टर-16 मधील 56 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला बँक ऑफ इंडियाच्या माजगाव शाखेत लिपिक पदावर कार्यरत असून या महिलेला कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाला आहे. याशिवाय कामोठे, सेक्टर-8 मधील 36 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला गोवंडीतील शताब्दी रुग्णालयामध्ये एक्सरे टेक्निशीयन म्हणून कार्यरत आहे.
खारघरमध्ये 3 नवे कोरोनाबाधित रुग्ण -