ठाणे- ध्यान भावना प्रशिक्षण शिबिरात गेलेले कल्याण येथील १२ नागरिक छत्तीसगडमध्ये महिनाभरापासून अडकून पडल्याची घटना समोर आली आहे.
विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या दिवसापासून या नागरिकांनी छत्तीसगडमधून कल्याणात आपल्या घरी येण्यासाठी महाराष्ट्र व छत्तीसगड शासनाकडे कैयफित मांडली. मात्र दोन्ही राज्यातील शासनाने आतापर्यंत प्रयत्न केले नसल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे. अखेर या नागरिकांनी 'ई टीव्ही भारत'च्या माध्यमातून पुन्हा एकदा अडकून पडललेल्या नागरिकांनी छत्तीसगडहुन कल्याणात येण्यासाठी मदत मागितली आहे.
कल्याणातील १२ नागरिक अडकून पडली छत्तीसगडमध्ये; कैफियत मांडूनही शासनाकडून प्रयत्न नाही ध्यान भावना प्रशिक्षण शिबिरासाठी छत्तीसगड राज्यातील महासमुद जिल्ह्यात असलेल्या बिरबिरा - तुमगावांतील धम्म लॅंड दि. रॉयल मोनेस्टिक स्कुल (गुरुकुल ) येथे १४ मार्च रोजी कल्याणातून हे १२ जण गेले होते. याठिकाणी १६ मार्च ते २५ मार्चपर्यंत म्हणजे १० दिवसांचे ध्यान भावना प्रशिक्षण शिबिर आटपून पुन्हा २७ मार्च रोजीचे कल्याणात येण्यासाठी परतीच्या प्रवासाची तिकिटे होती. मात्र २४ मार्चला केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आणि हे १२ नागरिक त्या ठिकाणी अडकून पडले, अशी माहिती महेंद्र बनसोडे यांनी ई टीव्ही भारतला दिली.
कल्याणातील १२ नागरिक अडकून पडली छत्तीसगडमध्ये; कैफियत मांडूनही शासनाकडून प्रयत्न नाही दरम्यान १२ पैकी काही नागरिक वयोवृद्ध असल्याने त्यांच्या औषधाचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता शासनाने आम्हाला लवकरात लवकर मदतीचे प्रयत्न करून आमची सुटका करावी, अशी मागणी त्यांनी 'ई टीव्ही भारत'च्या माध्यमातून केली आहे.