ठाणे- भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदारांच्या थंड प्रतिसादामुळे दुपारपर्यंत जेमतेम ३९.४२ टक्केच मतदान झाले होते. तर दुसरीकडे उन्हातान्हात एका शंभरी पार केलेल्या एका आजोबांनी मतदान केंद्रावर येवून आपला मतदानाचा अधिकार बजावला. कृष्णा धुमाळ असे आजोबांचे नाव असून ते १०५ वर्षाचे आहेत.
भिवंडी लोकसभा : शंभरी पार केलेल्या आजोबांनी बजावला मतदानाचा अधिकार
मुरबाड तालुक्यातील शंभरी पार केलेल्या आजोबांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कृष्णा धुमाळ असे आजोबांचे नाव असून ते १०५ वर्षाचे आहेत.
भिवंडीत १०५ वर्षांच्या आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क
कृष्णा धुमाळ हे आजोबा मुरबाड तालुक्यातील मुरबाड नगरपंचायत हद्दीतील शास्त्रीनगर, दुधाळेपाडा परिसरात रहातात. त्याच परिसरातील २६५ या मतदान केंद्र क्रमांकावर त्यांचे मतदार यादीत नाव आले. या मतदान केंद्रावर त्यांनी आपल्या नातेवाईकांसह येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान, भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व भाजपच्या उमेदवारामध्ये अटीतटीचा सामना रंगणार आहे. सायंकाळी ६ वाजता मतदान संपेपर्यंत ५३.६८ टक्के मतदान झाले.