ठाणे :ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरातील तहसील कार्यालयाच्या मागच्या बाजूने असलेल्या सिद्धार्थ नगरमध्ये शकील शेख हा कुटूंबासह एका पत्र्याच्या खोलीत राहतो. तो अंबरनाथ रेल्वे स्थानकासमोरील मार्गावर रेडिमेड कपड्यांची विक्री करून उदरर्निवाह करतो. विशेष म्हणजे शकीलला बोकड आणि बकरी पाळण्याची आवड आहे. त्याच्या घरच्या बकरीला दीड वर्षांपूर्वी एक पिल्लू झाले होते. त्यावेळी त्याचे नाव शकीलने 'शेरू' म्हणून ठेवले.
बोकडाचे वजन 100 किलो : शकीलच्या घरची गरीब परिस्थितीत राहूनही या बोकडाला श्रीमंती सारख्या थाटात या शेरूला लहानपणापासून प्रेमाने वाढवत शकीलने मोठे केले. या बोकडाच्या मानेवर जन्मापासून नैसर्गिकरित्या 'अल्लाह' आणि 'मोहम्मद' असे उर्दू भाषेतील शब्द अंगावर दिसत आहेत. तर या बोकडाला केवळ दोनच दात असून त्याचे वजन १०० किलो आहे.
शाळा बांधणार : येणाऱ्या बकरी ईदच्या सणाला शकीलने या बोकडाची १ कोटी १२ लाख ७८६ रुपयांत विक्री करायचे ठरवले आहे. हा बोकड विकून येणाऱ्या पैशांतून त्याच्या मूळ गावी गरीब मुलांसाठी शाळा बांधण्याचे आणि रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका खरेदी करण्याचे बोकड मालक शकील याने सांगितले. शेरू बोकडचा मालक शकील त्याला दरदिवशी सकाळ संध्याकाळ सफरचंद, द्राक्षे, बाजरी, मका, हरभरा असे पदार्थ खायला देतो.
बकरी ईदनिमित्त कुर्बानी :शकील याने या पूर्वीही असाच एक बकरा कुर्बानीसाठी विक्रीला ठेवला होता. त्याची किंमत १२ लाखांपर्यंत ठरवली होती. आता त्याच्या शेरूची १ कोटी १२ लाख ७८६ रुपयांत कोण विकत घेते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे 'शेरू'च्या संरक्षणासाठी घराच्या परिसरात सीसीटीव्ही लावले आहेत. कुर्बानीसाठी खास बकरा हवा असतो, बकरी ईद म्हणजे ईद-उल-अधा हा त्यागाचा सण म्हणूनही मुस्लिम धर्मीय मोठ्या उत्सवात साजरा करत असतात. हा सण साजरा करताना सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान, अमीर खान, सलमान खान या तिन्ही खान स्टारांच्या घरी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
हेही वाचा :
- Bakri Eid Special : पुण्याच्या लक्ष्मी बाजारात रॅम्बो बकऱ्याची चर्चा...पहा पुण्यातील रॅम्बो बकरा
- जसं नाव तसाच भाव.. 'सोन्याच्या' कुर्बानीला लाखोंची बोली
- कुर्बानीसाठी आणलेल्या रेड्याचा शासकीय कार्यालयाच्या आवारात धुमाकूळ, 2 तासानंतर पकडण्यात यश