महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उल्हासगरात दीड लाखांच्या अमली पदार्थासह आरोपीला अटक; गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई - रे क्राँस

२६ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

उल्हासगरात दीड लाखांच्या अमलीपदार्थसह आरोपीला अटक

By

Published : Jun 26, 2019, 5:46 AM IST

ठाणे - अंबरनाथ तालुक्यातील डावलपाडा-नेवाळी परिसरातील एका घरात अमलीपदार्थ विक्रीच्या गोरखधंदाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी या घरावर छापा मारून सुमारे दीड लाख रुपये किंमतीचा अंमली पदार्थाचा साठा जप्त केला. तसेच याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. गुलाम सरवार मकसुद अहमद खान असे आरोपीचे नाव आहे.

उल्हासगरात दीड लाखांच्या अमलीपदार्थसह आरोपीला अटक

विशेष म्हणजे २६ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. तसेच येत्या काही दिवसात अमलीपदार्थ विक्री करणाऱ्या माफियांना सळो कि पळो करून सोडणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाला हिललाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डावलपाडा नेवाळी येथे एका घरातून अमलीपदार्थ विक्रीचा मोठ्या प्रमाणावर गोरखधंदा सुरु असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या घरावर छापा मारली. यावेळी या घरातून ६२ हजार ५६५ रुपये किंमतीचा ४ किलो १७१ ग्रँम वजनाचा गांजा तसेच नशा येण्यासाठी वापरण्यात येणारे 'रे क्राँस' आणि 'फेनक्रेक्स' या नावाचा कप सिरपच्या एकूण ९२ हजार ८२५ रुपयाच्या १४४ बाटल्या जप्त केल्या. अशाप्रकारे एकूण १ लाख ५८ हजार ३९० रुपये किंमतीचा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे. तर हे अमली पदार्थ विक्री करणारा गुलाम सरवार मकसुद अहमद खान याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, आरोपीस उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक गणेश तोरगल हे अधिक तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details