महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन दुचाक्यांमध्ये समोरासमोर धडक; १ ठार ६ गंभीर जखमी - thane accident

टिटवाळा पूर्व कडील महात्मा फुले चौकात असलेल्या मधुबन बिल्डिंग समोर हा भीषण अपघात झाला. यात १ ठार तर, ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनास्थळ

By

Published : Jun 10, 2019, 8:54 AM IST

ठाणे- टिटवाळा पूर्वेकडील रेल्वे स्थानकाकडून कल्याणच्या दिशेने बनली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मधुबन बिल्डिंग समोर २ दुचाक्यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात १ जण ठार तर, ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातात मुन्ना मोहम्मद हा ठार झाला असून त्याचे मित्र धर्मेश कनोजिया आणि त्याचा एक साथीदार हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. तर, दुसऱ्या दुचाकीवरून जाणारे हिरामण चौधरी त्यांची पत्नी वनिता, मुलगा तन्मय, संकेत हेही गंभीर जखमी झाले आहेत स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,

टिटवाळा पूर्वकडील महात्मा फुले चौकात असलेल्या मधुबन बिल्डिंग समोर बनेली गावातील हिरामण चौधरी हे कुटुंबासह रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून घरच्या दिशेने जात होते, त्याच वेळी भरधाव वेगाने दुसऱ्या दुचाकीवरून मृत मुन्ना आणि जखमी धर्मेश व त्यांचा एक मित्र हे तिघे येत होते, त्याचदरम्यान भरधाव वेगाने मधुबन बिल्डिंग समोर येताच दोन्ही दुचाक्यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला, यावेळी स्थानिकांनी धाव घेऊन जखमींना टिटवाळा येथील महागणपती रुग्णालयात दाखल केले. यामधील मुन्ना मोहम्मद याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला कल्याण येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. तर, हिरामण चौधरी यांची पत्नी वनिता, मुले तन्मय आणि संकेत हे गंभीर जखमी झाले असून यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

तसेच मृत मुन्ना त्याच्या दुचाकीवर असलेल्या धर्मेश व त्याचा मित्र हेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावरही एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश खोपकर करीत आहे. अनेकदा इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी गाडीची वेग मर्यादा वाढविली जाते. मात्र, वेळेत पोहोचण्यासाठी वापरण्यात येणारे हेच वाहन आपल्या अतिघाईमुळे आपल्या व आपल्या कुटुंबाच्या जीवावर बेतत असल्याचे या अपघातातुन दिसून आल्याची चर्चा परिसरात होती.

ABOUT THE AUTHOR

...view details