सोलापूर - राजकारणात कधी काही होऊ शकते याच काही नेम नाही. सोलापूरच्या राजकारणातही असच काही अजब किस्सा घडला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत अध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपद ही एकमेकांच्या विरोधात असलेली दोन्ही पदे एकाच पक्षाकडे असल्याची अजब राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेते हे दोन्ही पदे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत.
अजबच! जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते एकाच पक्षाचे - loksaba election
लोकसभा निवडणुकीमध्ये संजय शिंदे हे पराभूत झाले असले तरीही सध्या ते सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये अशी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे हे जिल्हा परिषदेमध्ये अपक्ष म्हणून निवडून आले आणि भाजपला सोबत घेत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवले. जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे संख्याबळ अध्यक्ष होण्यासाठी असताना देखील संजयमामा शिंदे यांनी भाजपला सोबत घेऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवले. त्यामुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य जास्त असताना देखील राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसून विरोधी पक्षनेते पद घ्यावे लागले होते. मात्र, या लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय गणिते बिघडली आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेल्या संजयमामा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. माढा लोकसभा मतदारसंघातून संजयमामा शिंदे यांनी निवडणूक लढवावी यासाठी भाजपकडून त्यांना मोठा आग्रह केला जात होता, मात्र संजयमामा शिंदे यांनी भाजपला नकार देत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा लोकसभेची निवडणूक लढवली.
लोकसभा निवडणुकीमध्ये संजय शिंदे हे पराभूत झाले असले तरीही सध्या ते सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली. त्यामुळे सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत त्यामुळेच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे संजयमामा शिंदे यांच्या रूपाने राष्ट्रवादीकडे आले आहे. तर जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते पद हे देखील सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे पंचायत राज व्यवस्थेमध्ये एकाच पक्षाकडे अध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेते पद राहण्याची महाराष्ट्रातील ही दुर्मिळ घटना म्हणावी लागेल.