आदिनाथ साखर कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्याचे शरद पवारांचे आश्वासन
करमाळा तालुक्यातील आदिनाथ साखर कारखाना व मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकित कर्मचारी शेतकरी वाहतूकदार यांच्या पेमेंटसाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे, अशी माहिती मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अप्पासाहेब झांजुर्णे यांनी दिली.
करमाळा (सोलापूर) - तालुक्यातील आदिनाथ साखर कारखाना व मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकित कर्मचारी शेतकरी वाहतूकदार यांच्या पेमेंटसाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे, अशी माहिती मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अप्पासाहेब झांजुर्णे यांनी दिली.
झांजुर्णे म्हणाले, बारामती येथील गोविंद बागेत त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी तालुक्यातील विविध समस्यांबाबत चर्चा झाली आहे. सध्या कारखान्याचे नेतृत्व करणारे काही मंडळी दिशाहीन आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. योग्य नियोजनाअभावी कारखान्याची वाईट अवस्था झाली आहे. योग्य नेतृत्व नसल्याने दयनीय अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांंसाठी शरद पवार यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, असेही माजी अध्यक्ष अप्पासाहेब झांजुर्णे म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे करमाळा शहराध्यक्ष शिवराज जगताप उपस्थित होते.