महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हंगामी मजुरी वाढीसाठी यंत्रमाग कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - मोर्चा

यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना मजुरीमध्ये हंगामी ५० टक्के वाढ द्यावी, या मागणीसाठी 'लालबावटा यंत्रमाग कामगार युनियन'च्या वतीने गुरूवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.

यंत्रमाग कामगारांचे आंदोलन

By

Published : Mar 1, 2019, 2:57 PM IST

सोलापूर - यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना मजुरीमध्ये हंगामी ५० टक्के वाढ द्यावी, या मागणीसाठी 'लालबावटा यंत्रमाग कामगार युनियन'च्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.

सुधारित किमान वेतन जाहीर झालेले आहे. मात्र, या सुधारित किमान वेतनानुसार कामगारांना वेतन मिळत नाही, वेतनाचा प्रश्न 'टाईम रेट' की, 'पीस रेट', या प्रश्नावर अडकलेला आहे. हा प्रश्न सुटेपर्यंत कामगारांना हंगामी ५० टक्के वाढवावी, अशी मागणी सिटूच्या वतीने यावेळी करण्यात आली.

यंत्रमाग कामगारांचे आंदोलन

सोलापुरात एकट्या यंत्रमाग उद्योगात ४० हजार यंत्रमाग कामगार काम करत आहेत. एकाच शेडखाली चालणाऱ्या या कारखान्याच्या मालकांनी वेगवेगळे युनिट दाखवून कामगारांवर अन्याय केला आहे. यामुळे कामगारांना किमान वेतनानुसार वेतन मिळत नव्हते. याविरोधात कामगार संघटनांनी मोठ्या प्रमाणावर आवाज उठवल्यानंतर २९ जानेवारी २०१५ रोजी सुधारित किमान वेतन जाहीर केले होते. तसेच राज्य शासनाने त्याची अधिसूचना देखील काढली. मात्र, त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. यामुळे लालबावटा यंत्रमाग कामगार युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले आणि बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे.

लालबावटा यंत्रमाग कामगार युनियनच्या वतीने पुकारण्यात आलेला हा संप कामगारांचे मतदान घेऊन पुकारण्यात आला. यावेळी एकूण १२ हजार ८०६ कामगारांनी मतदान केले होते. त्यातील ११ हजार ८३३ कामगारांनी संपाला पाठिंबा दिला आणि ९७३ कामगारांनी संपाला विरोध केला होता. त्यामुळे ९५ टक्के कामगारांनी संपाला पाठिंबा दिल्यामुळे लालबावटा यंत्रमाग कामगार युनियनने हा संप करत असल्याचे गुरुवारी जाहीर केले.

ABOUT THE AUTHOR

...view details