सोलापूर -जुळे सोलापूर शिवजन्मोत्सव सांस्कृतिक मंडळाच्या महिला समितीच्यावतीने महाराष्ट्रात होणाऱ्या स्त्री अत्याचारांच्या विरोधात आक्रोश, निदर्शने करत आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांनी अशा घटनांतील आरोपींना त्यांनी जो गुन्हा केला आहे तीच शिक्षा त्यांना द्या, अशी मागणी केली. त्यासाठी आपल्यातील शिवाजी महाराज जागवा, असं आवाहनही या संतप्त महिलांनी या आंदोलनाच्या निमित्ताने केले आहे.
महिला अत्याचारांच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लज्जास्पद, सोलापुरात महिलांचा आक्रोश हेही वाचा -'सुशील करंडक 2020' स्पर्धेचे अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते उदघाटन
महाराष्ट्राची प्रतिमा कलंकित करणाऱ्या घटना राज्यभर घडत आहेत. एकतर्फी प्रेमातून हिंगणघाटला एका प्राध्यापिकेला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्यात आले. औरंगाबाद सिल्लोड तालुक्यातील अंधारलेल्या घरात महिला एकटी आहे हे पाहून अत्याचाराचा प्रयत्न झाला तिनेही प्रतिकार केला तर तिला रॉकेल टाकून पेटवून दिले. तर मुंबईतील काशिमिरा भागात बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी एकीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेसाठी या सर्व घटना लज्जास्पद आहेत. या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी जुळे सोलापूर शिवजन्मोत्सव सांस्कृतिक मंडळ महिला समितीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा -माघी यात्रेनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा
दरम्यान, अत्याचार करणाऱ्याला भरचौकात फाशी दिली पाहिजे. हैदराबाद प्रमाणे गुन्हेगारांचे एन्काऊंटर केलं पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. महिला अत्याचारांमुळे महिलांमधील असंतोष या आंदोलनाच्या निमित्ताने बाहेर पडला. या आंदोलनावेळी जुळे सोलापुरातल्या महिला या आंदोलनात सहभागी झाल्या.