महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर : अंगावर माळवद पडुन आईचा मृत्यू; मुलगी वाचली - women died in a slab collapse

झोपेत घराचे माळवद अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोलापूरच्या माढा तालुक्यातील शेटफळमध्ये घडली आाहे. या घटनेत महिलेची मुलगी मात्र थोडक्यात बचावली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

सोलापूर : अंगावर माळवद पडुन आईचा मृत्यू; मुलगी वाचली
सोलापूर : अंगावर माळवद पडुन आईचा मृत्यू; मुलगी वाचली

By

Published : Oct 2, 2021, 9:07 AM IST

सोलापूर : झोपेत घराचे माळवद अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोलापूरच्या माढा तालुक्यातील शेटफळमध्ये घडली आाहे. या घटनेत महिलेची मुलगी मात्र थोडक्यात बचावली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

मुलीच्या घरीच काळाचा घाला
निलावती शहामूर्ती चव्हाण असे मृत महिलेचे नाव आहे. निलावती यांची मुलगी छाया ही शेटफळ गावात राहते. छाया आजारी असल्याने तिला पाहण्यासाठी निलावती या शेटफळमध्ये आल्या होत्या. गुरूवारी मुलीच्या घरी मुक्काम करून शुक्रवारी त्या भेंड गावी जाणार होत्या. मात्र रात्री झोपेत असतानाच घराचे माळवद त्यांच्या अंगावर कोसळले. या घटनेत निलावती यांची मुलगी छाया थोडक्यात बचावली आहे. या घटनेवर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात निलावती यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा -मातृदिनाच्या दिवशीच मुलाला वाचवताना आईचा मृत्यू; गेवराई तालुक्यातील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details