महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चोरी करणाऱ्या महिलेला अटक, रिक्षात प्रवास करताना शेजारच्या महिलेचे पळवले दागिने

सोलापूर - रिक्षामधून प्रवास करताना सह प्रवाशी महिलेचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. सदर व्यक्तीला 12 तासांत सापडून अटक करत त्याने लंपास केलेले दागिने सबंधीत महिलेला पोलिसांनी परत केले आहेत.

चोरी करणाऱ्या महिलेला अटक, रिक्षात प्रवास करताना शेजारच्या महिलेचे पळवले दागिने
चोरी करणाऱ्या महिलेला अटक, रिक्षात प्रवास करताना शेजारच्या महिलेचे पळवले दागिने

By

Published : Jun 9, 2021, 10:03 PM IST

सोलापूर - रिक्षामधून प्रवास करताना सह प्रवाशी महिलेचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. सदर व्यक्तीला 12 तासांत सापडून अटक करत त्याने लंपास केलेले दागिने संबंधित महिलेला पोलिसांनी परत केले आहेत. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चोरी करणाऱ्या महिलेला अटक, रिक्षात प्रवास करताना शेजारच्या महिलेचे पळवले दागिने

बारा तासांत चोरीचा तपास

तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्यांनी बारा तासांतच चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. मंगळवारी सकाळी अंबिका धोत्रे (रा चिंचोळी एमआयडीसी, सोलापूर) ही प्रवाशी महिला रिक्षामधून कोंडी ते चिंचोळी एमआयडीसीकडे जात होती. तीच्या बाजूला सहप्रवासी म्हणून दुसरी संशयीत महिला बसली होती. चिंचोळी येथे उतरल्यानंतर अंबिका धोत्रे या प्रवाशी महिलेला कळाले की, तीच्या जवळील पर्स चोरोली गेली आहे. त्यामध्ये 1 लाख 60 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 42 हजार 500 रुपये रोख रक्कम होती. सदर प्रवाशी महिलेने ताबडतोब तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दरम्यान, पोलिसांंनी तात्काळ संशयित महिलेचा शोध घेतला.

बारा तासांत महिलेला केली अटक

तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तपासाची चक्रे फिरवली आणि सुषमा चव्हाण (वय 24 रा बिस्मिल्ला नगर, सोलापूर) या महिलेस अटक केली. दरम्यान, तिने पळवलेल्या दागिन्यांसह मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेत संबंधीत महिलेला परत केला. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक अरुण फुगे, एपीआय नेताजी बंडगर, एपीआय माधुरी तावरे, बाळू राठोड, सांजेकर, शशी शिंदे, फयाज बागवान, सुनील बनसोडे, श्रीराम आडलिंग, वैशाली कुंभार, सरस्वती लोकरे, सुनील चवरे, असिफ शेख, देवा सोलांकर, किशोर सलगर, अशोक खवतोडे, राजू इंगळे, आदींचा समावेश होता.

ABOUT THE AUTHOR

...view details