महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CPM Leader Narsayya Adam : 'वाढीव वीज दर कमी न केल्यास महावितरण कार्यालय ताब्यात घेऊ'

वाढीव वीजदर व इंधन समायोजन आकार तात्काळ रद्द केले पाहिजे तसेच गोदूताई परुळेकर वसाहतीतील विद्युत ग्राहकांच्या व विद्युत वितरण व्यवस्थेबद्धल तक्रार निवारण करून वीज ग्राहकांना योग्य सेवा दिली पाहिजे. या प्रमुख मागण्या घेऊन माकप नेते व माजी आमदार नरसय्या आडम मास्तर ( CPM leader Narsayya Adam ) व माकप चे जिल्हा सचिव एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा करून धरणे आंदोलन करण्यात आले.

CPM Leader Narsayya Adam
माकप नेते नरसय्या आडम

By

Published : Aug 3, 2022, 5:50 PM IST

सोलापूर -मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ( CPM ) वतीने बुधवार 3 ऑगस्ट रोजी अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालय जुनी मिल कंपाउंड येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी माकप नेते नरसय्या आडम ( CPM leader Narsayya Adam ) यांनी गंभीर इशारा दिला, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास महावितरण कार्यालय ताब्यात घेऊ असे आडम म्हणाले. वाढीव वीजदर व इंधन समायोजन आकार तात्काळ रद्द केले पाहिजे तसेच गोदूताई परुळेकर वसाहतीतील विद्युत ग्राहकांच्या व विद्युत वितरण व्यवस्थेबद्धल तक्रार निवारण करून वीज ग्राहकांना योग्य सेवा दिली पाहिजे. या प्रमुख मागण्या घेऊन माकप नेते व माजी आमदार नरसय्या आडम मास्तर व माकप चे जिल्हा सचिव एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा करून धरणे आंदोलन करण्यात आले.

अधीक्षकांना सादर केलेल्या निवेदनात -जन आंदोलनाद्वारे निवेदन देण्यात आले आहे कि, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीज पुरवठा केला जातो. यामध्ये सर्वसाधारण व्यक्तीपासून शेतकरी, खाजगी कंपन्या, औद्योगिक केंद्र, विविध शासकीय-निमशासकीय कार्यालय आदींचा समावेश आहे. यांना वीज पुरवठा करत असताना घरगुती आणि वाणिज्य अशी सर्वसामान्य वर्गवारी महावितरणाकडून केलेली आहे. महावितरणाकडून वीज पुरवठा सहित थकबाकी वसूल करणे हे देखील महत्वाचे कार्यालयीन काम आहे.

इंधन समायोजन शुल्क आकारणी सुरू -महावितरण कंपनीने मागील दोन वर्षापासून बंद असलेले इंधन समायोजन आकारणी शुल्क जून २०२२ पासून सुरु करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार जून ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत ५ महिने हि दरवाढ असल्याचे सांगितले. जून महिन्याच्या वीज बिलात त्या प्रकारे वाढही करण्यात आलेली आहे. हि वाढ सर्वसामान्य जनतेला विश्वासात न घेता जाचकपणे लादलेली आहे. हे तात्काळ मागे घेणे आवश्यक आहे. मोठे उद्योजक, भांडवलदार, राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांच्याकडे हजारो कोटी रुपयांची थकबाकी आहे. याची वसूली महावितरण कंपनीकडून होत नाही. महावितरण कंपनीचा आर्थिक तुटवडा भरून काढण्यासाठी कामगार, सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांकडून वीज दर वाढवून सक्तीने वसूल केले जाते. हि विसंगती अत्यंत गंभीर असून वाढीव वीजदर तातडीने मागे घेऊन इंधन समायोजन आकारणी रद्द करावे अशी मागणी यावेळी आंदोलनात करण्यात आली.

मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले -माकपच्या वतीने शिष्टमंडळाद्वारे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांना निवेदन सादर करण्यात आले. या शिष्टमंडळात माजी आमदार व माकप नेते नरसय्या आडम, नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, युसूफ शेख, अनिल वासम, फातिमा बेग, शकुंतला पाणीभाते, सुनंदा बल्ला, आरिफा शेख, गंगुबाई कणकी, ताहेरा शेख, संगीता एडके, उमा साबळे, विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, विक्रम कलबुर्गी, आरिफा मणियार, अनिल वासम, मोहन कोक्कुल आदी उपस्थित होते.

हेही वाचा -Mob Lynching : गायींच्या तस्करीचा आरोप करत अमरावतीच्या एकाची मध्यप्रदेशात हत्या.. दोघे गंभीर जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details