महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेकडो झाडे वाचविण्यासाठी संघर्ष सुरू; पाण्याअभावी झाडे धोक्यात - karmala

या कामासाठी पर्यारणप्रेमी दानशुरांनी मदत करावी, अशी आपेक्षा या कुटुंबाकडून व्यक्त केली जात आहे.

झाडे जगवण्यासाठी धडपड सुरू

By

Published : Apr 7, 2019, 4:51 PM IST

सोलापूर- करमाळा तालुक्यातील श्री देवीचा माळ परिसरात मागील ४ वर्षांपासून मोठ्या कष्टाने जोपासलेली झाडे पाण्याअभावी जळून जात आहेत. या झाडांना जगवण्याची धडपड सुरवसे आणि मोकाशी यांच्या कुटुंबाने सुरू केली आहे. या कामासाठी पर्यारणप्रेमी दानशुरांनी मदत करावी, अशी आपेक्षा या कुटुंबाकडून व्यक्त केली जात आहे.


करमाळा तालुक्यातील श्री देवीचा माळ येथील श्री खंडोबा मंदिर परिसरातील शेकडो झाडांचे भविष्य पाण्याअभावी धोक्यात आले आहे. येथील देवराईस पाण्याची गरज निर्माण झाली असून पर्यावरण प्रेमी दानशुरांनी पाणी पुरवठ्यासाठी योगदान देण्याची आवश्यकता आहे. देवीचा माळ येथील प्रसिद्ध श्री कमलाभवानी माता मंदिरानजीक असलेल्या श्री खंडोबा मंदिर परिसरात पर्यावरण प्रेमी युवक तेजस सुरवसे तसेच पुजारी मोकाशी परिवार यांच्या अथक योगदानातून शेकडो झाडे वाढीला लागलेली आहेत. परिसरात ३ ते ४ वर्षांपूर्वी लागवड झालेल्या या झाडांमुळे नैसर्गिक सुंदरता वाढीस लागली आहे. मात्र, सध्याच्या दुष्काळ स्थितीत पाण्याअभावी ही झाडे संकटात सापडल्याचे दिसून येत आहे.

झाडे जगवण्यासाठी सुरू असलेली धडपड सांगताना महिला


या परिसरातील जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या झाडांना पाणी मिळणे अवघड झाले असल्याची माहिती तेजस सुरवसे यांनी दिली आहे. सध्या मिळेल त्या पद्धतीने सुरवसे आणि श्रीमती मोकाशी हे झाडे जगविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना पर्यावरणप्रेमी दानशुरांकडून मदतीची आवश्यकता निर्माण झाली असून झाडे जगण्यासाठी पाण्याचा टँकर मिळावा. अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. या झाडांसाठी जर योग्य वेळी पाणी मिळाले तर जळत चाललेल्या झाडांना जीवनदान मिळण्यास मदत होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details