पंढरपूर -गेल्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी आषाढी वारीवर कोरोनाचे सावट आहे. यंदाचा आषाढी वारी सोहळा एका महिन्यावर येऊन ठेपला आहे. पांडुरंगाची आषाढी वारी सोहळा कशा पद्धतीने साजरा होणार याकडे वारकरी, फडतरी व दिंडीकरी संप्रदायाचे लक्ष लागले आहे. वारकरी संप्रदाय, फडकरी व दिंडीकरी संप्रदायाकडून पायी पालखी सोहळ्याला राज्य सरकारने परवानगी द्यावी, कोणत्याही परिस्थितीत पायी वारी करण्यासाठी महाराज मंडळी ठाम आहेत. त्यातच उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातल्या विश्वस्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. यामध्ये संप्रदायांमधील सदस्यांनादेखील आमंत्रण द्यावे, अशी मागणी महाराज मंडळांकडून होत आहे.
माहिती देताना हभप भाऊसाहेब महाराज गोसावी हेही वाचा -शरद पवार यांचा सरकारला पूर्ण आशीर्वाद - संजय राऊत
मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत विश्वस्त यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक
पांडुरंगच्या आषाढी वारी सोहळ्यासंबंधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यातील मुख्य देवस्थानांच्या विश्वस्तांसोबत शुक्रवारी बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये आषाढी सोहळ्यासंदर्भात ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामध्ये कोरोना पार्श्वभूमीवर आषाढी वारी सोहळा कशा पद्धतीने घेता येईल. यावर चर्चा केली जाणार आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने होणार आहे. तरी या बैठकीकडे संपूर्ण वारकरी संप्रदाय व महाराज मंडळींचे लक्ष लागले आहे.
राज्य सरकारकडून आषाढी वारी सोहळ्यासाठी पायी दिंडीसाठी परवानगी घ्यावी
आषाढी वारीबाबत वारकरी संप्रदाय आक्रमक झाल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी विठुरायाची आषाढी वारी साधेपणाने साजरी झाली, त्यावेळी मानाच्या पालख्यांना एसटीमधून पंढरपुरात आणण्यात आले होते. त्याबाबतील दुःख अजूनही वारकरी संप्रदायात आहे. या वर्षी होणाऱ्याा आषाढी वारीवर कोरोनाचे संकट आहे. राज्य सरकारने आषाढी वारीबाबत पायी पालखी सोहळ्याला परवानगी घ्यावी, तसेच मानाच्या पालख्या कोणत्याही वाहनाने न पाठवता पायी पाठवण्याचा निर्णय घ्यावा. अशी मागणी वारकरी फडकरी व दिंडीकरी संप्रदायातील महाराज मंडळींनी केली आहे.
वारकरी संप्रदाय कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करणार -
यंदाचा आषाढी सोहळा वारकरी संप्रदायासाठी महत्त्वाचा आहे. पांडुरंगाच्या आषाढी वारी संदर्भात पायी दिंडीची परवानगी राज्य सरकारने द्यावी, कोरोना पार्श्वभूमीवर हा आषाढी सोहळा होत आहे. त्यामुळे राज्य सरकार जे कोरोना नियमावली तयार करून देईल, त्या प्रमाणे वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी व वारकरी त्याचे पूर्णपणे पालन करून आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होतील. राज्य सरकारने पायी दिंडीबाबत वारकरी संख्या ठरवावी, वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांची राज्य सरकारने लसीकरण करावे, उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मुख्य देवस्थानच्या विश्वस्तांसोबत वारकरी संप्रदायातील सदस्यांनाही बैठकीस आमंत्रण द्यावे, यामुळे आता राज्य सरकार विरोधात वारकरी संप्रदाय असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. पायीवारीवर वारकरी संप्रदाय व महाराज मंडळी ठाम असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा -जायकवाडी धरणाचा पाणीसाठा फक्त 37 टक्के