महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपूरचे सुप्रसिद्ध विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आजपासून बंद, नित्य उपासना राहणार सुरु - पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदिर न्यूज

पंढरपूरमधील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर आजपासून 30 एप्रिलपर्यंत भाविकांसाठी बंद राहणार आहे. मात्र, पांडुरंगाची नित्य उपासना सुरूच राहणार आहे.

pandharpur
पंढरपूर

By

Published : Apr 5, 2021, 11:50 AM IST

Updated : Apr 5, 2021, 1:02 PM IST

पंढरपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने सर्व धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी 30 एप्रिलपर्यंत बंद असणार आहे. याबाबतचा निर्णय मंदिर समितीकडून घेण्यात आला आहे. याची माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आजपासून 30 एप्रिलपर्यंत भाविकांसाठी बंद

राज्य सरकारच्या "मिशन ब्रेक द चेन" या मोहिमेअंतर्गत विठ्ठल मंदिर बंद

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने 'मिशन ब्रेक द चेन' या मोहिमेअंतर्गत राज्यातील धार्मिक, प्रार्थना स्थळे 5 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीलाही मंदिर बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे हे मंदिर आजपासून (5 एप्रिल) 30 एप्रिल रोजी रात्री बारा वाजेपर्यंत बंद राहणार आहे. याबाबतचे आदेश मंदिर समितीकडून देण्यात आले आहेत.

पांडुरंगाची नित्य उपासना राहणार सुरू

पंढरीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने अध्यक्ष औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंदिर समितीच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये राज्य सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करत विठ्ठल मंदिर 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, बंदच्या काळात पांडुरंगाची नित्य उपासना सुरू राहणार आहे.

हेही वाचा -मिशन 'ब्रेक दि चेन'.. लॉकडाऊन व निर्बंधाबाबत नियमावली जाहीर, काय राहणार सुरू व काय होणार बंद ?

हेही वाचा -मिशन 'ब्रेक दि चेन'.. लॉकडाऊन व निर्बंधाबाबत नियमावली जाहीर, काय राहणार सुरू व काय होणार बंद ?

Last Updated : Apr 5, 2021, 1:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details