पंढरपूर -राज्य सरकारकडून घटस्थापनेच्या दिवशी राज्यातील सर्व मंदिरे उघडण्याची परवानगी दिली आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरही भाविकांसाठी 7 ऑक्टोबरपासून उघडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून मंदिर स्वच्छ करण्यावर भर दिला जात आहे. कोरोना नियमांचे पालन करून भाविकांना पांडुरंगाचे दर्शन देण्यात येणार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. ते 'ईटीव्ही भारत'सोबत बोलत होते.
विठ्ठल मंदिराची स्वच्छता मोहीम -
विठ्ठल रुक्मिणी मंदिर सहा महिन्यापासून भाविकांच्या प्रतिक्षेत आहे. राज्य सरकारकडून 7 ऑक्टोबरपासून विठुरायाचे मंदिर उघडायला परवानगी देण्यात आली आहे. विठ्ठल मंदिर समितीकडून दोन दिवसापासून विठुरायाच्या मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विठ्ठल व रुक्मिणी मातेचा गाभारा, मुख्य सभामंडप, सोळखांबी, नामदेव पायरी स्वच्छ करण्यात आली आहे. यामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
हेही वाचा -न्यायालयाने फेटाळला विनंती अर्ज, सचिन वाझेची तळोजा कारागृह रुग्णालयात रवानगी