पंढरपुर- आषाढी वारीच्या महापुजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून विठ्ठल मंदिरातील विणेकारी विठ्ठल बढे (वय 84 चिंचपुर पंगुळ जिल्हा. अहमदनगर) यांना मान मिळाला आहे.
पंढरीतील मानाचा वारकरी ठरला; जाणून घ्या कोण आहे 'तो' मानकरी - vitthal badhe
यंदाची आषाढी वारी कोरोनाच्या महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे. १ जुलैला एकदशीची पुजा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या बरोबरीने ६ वर्ष विठ्ठल मंदिर विणेकारी म्हणून काम करणारे विठ्ठल बढे यांना महापुजेचा मान मिळलेला आहे. हा निर्णय विठ्ठल मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
यंदाची आषाढी वारी कोरोनाच्या महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे. १ जुलैला एकदशीची पुजा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या बरोबरीने ६ वर्ष विठ्ठल मंदिर विनेकारी म्हणून काम करणारे विठ्ठल बढे यांना महापुजेचा मान मिळलेला आहे. हा निर्णय विठ्ठल मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
विठ्ठल बढे हे गेल्या सहा वर्षापासून मंदिरात वीणेची सेवा देण्याचे काम करता आहेत. दरवर्षी मुख्यमंत्र्या बरोबर मानाचा वारकरी म्हणून दर्शन रांगेतून येणाऱ्या भक्ताची निवड केली जात असते. मात्र, कोरोनामुळे यावर्षी पंढरीत वारकरी आणि भक्तांना येण्यासाठी बंदी घातली आहे. पण मानाच्या वारकऱ्यांच्या महापूजेची परंपरा शेकोडो वर्षांची आहे. मंदिरात गेली अनेक वर्षे विनेकारी म्हणून काम करणाऱ्या सहा विनेकाऱ्यांची निवड मंदिर समिती केली होती. त्यापैकी एक विनेकाऱ्यांची पांडुरंगाची चिट्ठी या पद्धतीने ही निवड करण्यात आली, अशी माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली..