महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आषाढी एकादशी : लातूरच्या चव्हाण दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान - विठ्ठल मारुती चव्हाण

यंदाच्या विठ्ठल पूजेचा मान लातूमधील अहमदपूरच्या चव्हाण दाम्पत्याला मिळाला.

लातूरच्या चव्हाण दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान

By

Published : Jul 12, 2019, 2:48 AM IST

Updated : Jul 12, 2019, 9:18 AM IST

पंढरपूर - पंढरीत पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास विठूरायाची शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यंदाच्या पूजेचा मान लातूरमधील अहमदपूरच्या चव्हाण दाम्पत्याला मिळाला. विठ्ठल मारुती चव्हाण आणि प्रयाग विठ्ठल चव्हाण यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा केली. चव्हाण दाम्पत्य हे अहमदपूर तालुक्यातील सांगवी सुनेगाव तांडा येथील रहिवासी आहेत.

लातूरच्या चव्हाण दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान

शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळावा, अशी मागणी विठ्ठलाकडे केल्याचे यावेळी चव्हाण दाम्पत्याने सांगितले. दरम्यान, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आषाढी एकादशीच्या निमित्ताने खास रोषणाई करण्यात आली होती. या दिव्यांच्या रोषणाईने परिसर अक्षरश: उजळून निघाला होता.

लातूरच्या चव्हाण दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान
Last Updated : Jul 12, 2019, 9:18 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details