पंढरपूर :पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तसेच,भाजप नेते कल्याणराव काळे यांच्या प्रवेश समारंभाचा कार्यक्रम पंढरपूर येथे झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री दत्ता भरणे हे उपस्थितीत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी कोरोना नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयोजक श्रीकांत शिंदेंवर गुन्हा दाखल
भाजप नेते व चंद्रभागा साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सभेत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या तोंडाला मास्क नव्हते. सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे असतानाही कोणत्या प्रकारच्या नियमांचे पालन करण्यात आले नाही. यामुळे आयोजक श्रीकांत शिंदे यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात 188 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.