महाराष्ट्र

maharashtra

ते चारचाकीतून आले आणि नवजात बालकाला मंदिरात सोडून गेले

By

Published : Jul 13, 2021, 9:19 AM IST

सोमवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास बावी येथील सिद्धेश्वरच्या मंदिराजवळ एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी आली होती. या गाडीतून चार पुरुष आणि एक महिला हातात लहान बाळाला घेऊन उतरले. मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. लहान बाळ तिथेच सोडून कुर्डुवाडीच्या दिशेने घाईगडबडीने गाडी निघून गेली. अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

Unidentified persons left newborn baby in Siddheshwar temple, solapur
ते चारचाकीतून आले आणि नवजात बालकाला मंदिरात सोडून गेले

सोलापूर - जिल्ह्यातील कुर्डुवाडी - पंढरपूर रस्त्यावरील बावी येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात सोमवारी सकाळी आठ ते दहा दिवसांचे पुरुष जातीचे नवजात अर्भक सापडले आहे. एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी आली आणि नवजात बालकाला मंदिरात सोडून कुर्डुवाडीच्या दिशेने निघून केली अशी माहिती गावातील नागरिकाने दिली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दहा दिवसांच्या बाळाला असे सोडून गेल्याने बावी गावात हा चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत कुर्डवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मंदिरात नवजात बालक आढळले

चारचाकीतून आले आणि बाळाला सोडून गेले -

सोमवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास बावी येथील सिद्धेश्वरच्या मंदिराजवळ एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी आली होती. या गाडीतून चार पुरुष आणि एक महिला हातात लहान बाळाला घेऊन उतरले. मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. लहान बाळ तिथेच सोडून कुर्डुवाडीच्या दिशेने घाईगडबडीने गाडी निघून गेली. अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

गोंडस बाळ सुखरूप-

स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती गावातील पोलिस पाटीलांना दिली. त्यांनी लहान बाळाला तातडीने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नवजात अर्भकाची म्हणजेच त्या गोंडस बाळाची प्रकृती सुखरूप आहे. या घटनेची बावी परिसरात व माढा तालुक्यात समजताच तर्कवितर्क चर्चांना उधाण आले आहे. तर या घटनेने "माता न तू वैरीणी' अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details