महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 17, 2020, 5:49 PM IST

ETV Bharat / state

सोलापुरात लॉकडाऊनमध्ये गुन्हे शाखेकडून दोन लाखांची गावठी दारू जप्त

सोलापुरात दहा दिवसांचे लॉकडाऊन सुरू झाले आहे. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेने कारवाईचा बडगा हाती घेतला असून दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये हातभट्टी दारू वाहतूक करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान टाकण्यात आलेल्या तीन छाप्यांत चार मोटरसायकल व ८३० लिटर गावठी दारू असा एकूण १ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोलापुरात हाथभट्टी दारू जप्त बातमी
सोलापुरात हाथभट्टी दारू जप्त बातमी

सोलापूर :येथेलॉकडाऊन काळात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 1 लाख 81 हजारांची गावठी दारू जप्त केली आहे. जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत व जोडभावी पोलीस ठाण्यात याप्रकरणी सुरेश ऊर्फ अप्पू हरिबा पवार (वय ३७ वर्षे रा. पोचू तांडा बक्षी हिप्परगा) आणि श्रीकांत देसू राठोड (वय २८ वर्षे रा. सीताराम तांडा बक्षी हिप्परगा दक्षिण सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे.

सोलापुरात दहा दिवसांचे लॉकडाऊन सुरू झाले आहे. तर, अवैध व्यवसाय मात्र जोमात सुरू आहेत. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेने कारवाईचा बडगा हाती घेतला असून दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हातभट्टी दारू वाहतूक करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. सोलापूर शहरातील जोडभावी पोलीस ठाण्यामध्ये दोन तसेच जेल रोड पोलीस ठाणे येथे एक असे एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या कारवाईत अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीन छाप्यांत चार मोटरसायकल व ८३० लिटर गावठी दारू असा एकूण १ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी सहायक पोलीस निरक्षक अजित कुंभार, पोलीस हवालदार बाबर कोतवाल, पोलीस नाईक संदीप जावळे, विनायक बर्डे, पोलीस शिपाई उमेश सावंत, समर्थ शेळवणे, स्वप्नील कसगावडे, चालक प्रफुल गायकवाड यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details