महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चारचाकीची ट्रॅक्टरला धडक, दोघे जळून ठार - Two killed in road accident

चारचाकी गाडीची उसाच्या ट्रॅक्टरला धडक बसून चारचाकीला लागलेल्या आगीत दोघांचा जळून मृत्यू झाला आहे.

अपघातात जळालेली गाडी
अपघातात जळालेली गाडी

By

Published : Dec 30, 2019, 11:11 AM IST

Updated : Dec 30, 2019, 12:39 PM IST

सोलापूर- चारचाकी गाडी उसाच्या ट्रॅक्टरला मागून धडकली. यामध्ये चारचाकीने पेट घेतल्याने वाहनातील दोघांचा जळून मृत्यू झाला. हा अपघात कुर्डूवाडी-बार्शी मार्गावरील चिंचगाव (ता.माढा) येथील हॉटेल वैशालीजवळ रविवारी (दि. 29 डिसें) रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास झाला.

चारचाकीची ट्रॅक्टरला धडक


काकासाहेब सुरेश राऊत (वय 28 वर्षे), अविनाश मल्लाप्पा गिराम (वय 33 वर्षे, दोघे रा. रायगव्हाण, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) अशी अपघातात होरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. काकासाहेब राऊत हे छावा संघटनेचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष आहेत.


रायगव्हाण गावातील चौघे पुण्याला स्थळ पाहण्यासाठी गेले होते. मुलगी पाहून परतताना दोघे नातेवाईकांजळ थांबले. तर दोघे आपल्या गावी परतत होते. दरम्यान, हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच कुर्डूवाडी पोलीस नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबासह दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, त्यामध्ये जळून दोघांचा मृत्यू झाला होता. दोघांचेही मृतदेह कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली असून त्यांचा आक्रोश सुरू आहे.

हेही वाचा - प्रहारच्या कार्यकर्त्यांची 'सायकलवारी'; बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळावे म्हणून विठ्ठलाला साकडे

Last Updated : Dec 30, 2019, 12:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details