महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माढ्यातील प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्याने पहिला पगार दिला 'कोरोना'साठी

माढ्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने आपला पहिला पगार कोरोना विषाणूच्या समस्येत अडकलेल्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षय औदुंबर गायकवाड (रा. शुक्रवार पेठ, माढा) असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

जीवनाश्यक वस्तूचे वाटप करताना अक्षय यांचे आईवडिल
जीवनाश्यक वस्तूचे वाटप करताना अक्षय यांचे आईवडिल

By

Published : Apr 15, 2020, 9:54 AM IST

माढा (सोलापूर) - नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाने आपला पहिला पगार 'कोरोना'च्या दुष्टचक्रात अडकलेल्यांसाठी दिला आहे. अक्षय औदुंबर गायकवाड (रा. शुक्रवार पेठ, माढा) असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

अक्षय गायकवाड (प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक)

अक्षय यांना मिळालेल्या पहिल्या पगारातून निम्मी पगार सरकारने कोरोनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला, असे असताना देखील त्यांनी उर्वरित रक्कमही देण्याचा निर्णय घेतला. यात गावभर भंटकती करुन गुजराण करत हातावरचे पोट असलेल्या 15 गोरगरीब वंचित कुटुंबीयांना 15 दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक साहित्याचे किट दिले आहे. अक्षय गायकवाड हे नाशिक मध्येच प्रशिक्षण घेत आहे. यामुळे त्यांच्या आई वडिलांनी आपल्या मुलाची इच्छा पाहून गोरगरिबांच्या घरापर्यंत जाऊन ही मदत दिली आहे. तर आपल्या मित्राच्या कार्याचा अभिमान बाळगत अक्षयच्या मित्र परिवाराने देखील साहित्य वाटपात मदत केली. अक्षयचे वडील औदुंबर हे शहरातील मनकरणा पतसंस्थेत पिग्मी एजंट (प्रतिनिधी) म्हणून काम करतात.

हेही वाचा -लॉकडाऊन : वांद्रे स्थानकाबाहेर जमलेल्या जमावावर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

राज्यावर आलेल्या संकटाचे भान राखून केवळ बोलण्यापेक्षा कृतीतून त्यांनी खाकी वर्दीत सामजिक बांधिलकी असल्याचे दाखऊन दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details