महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अरण येथे तिहेरी अपघात, तीन ठार - अरण

सोलापूर-पुणे महामार्गावरील अरण येथे झालेल्या तिहेरी अपघातात तीघे ठार झाले तर चार जण जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त वाहने
अपघातग्रस्त वाहने

By

Published : Dec 15, 2019, 8:32 PM IST

सोलापूर- सोलापूर-पुणे या राष्ट्रीय महामार्गावर आज (रविवार) दूपारी झालेल्या तिहेरी अपघातात तीन जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात माढा तालूक्यातील अरण गावाजवळ झाला आहे. दोन दुचाकी आणि एक चार चाकी यांच्यामध्ये हा अपघात झाला आहे.

आज दूपारी 1 वाजण्याच्या सूमारास अरण गावाच्या जवळ चारचाकी गाडी पुण्याहून सोलापूरकडे जात होती. ही चारचाकी गाडी अरण या गावाजवळ आली असता या गाडीने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना ठोकरले. गाडीचा वेग जास्त असल्यामुळे ही गाडी पून्हा विरूद्ध दिशेला घुसून त्यानंतर समोरून येणाऱ्या दोन मोटरसायकलींना देखील ठोकरले. यामध्ये एका दूचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले. तर चार चाकी गाडीतील एक महिला देखील ठार झाली आहे. मुंबईच्या उल्हास नगर येथील प्रतिभा सोमलिंह उसाई (वय 43 वर्षे) या जागीच ठार झाल्या आहेत. इतर दोन मयताची नावे समजू शकलेली नाहीत. या अपघातामध्ये राजेंद्र तूकाराम रणदिवे, अरूण संपती साळुंखे (दोघे रा. पालवन ता. माढा), शिवाजी नागनाथ शिंदे, व निवृत्ती देवू दळवी (दोघे रा.कोंडी) हे जखमी झाले आहेत.

हेही वाचा - सोलापुरात 'या' ठिकाणी दररोज भरते कावळ्यांची जत्रा, प्रेमाचा घास भरवितात 'कावळे मामा'


या अपघातानंतर मोडनिंब येथील वाहतूक शाखेच्या पोलिसांना जखमींना उपचारासाठी मोडनिंब येथील शासकीय रूग्णालयात पाठविले ठार झालेल्यांचे मृतदेह हे टेंभूर्णी येथील शासकीय रूग्णालयात पाठविले आहेत.

हेही वाचा - पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा; फास्टटॅगचा वाहनचालकांना मन:स्ताप

ABOUT THE AUTHOR

...view details