महाराष्ट्र

maharashtra

दारूबंदी कायद्याअंतर्गत तिघांना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By

Published : Mar 13, 2021, 7:05 AM IST

Updated : Mar 13, 2021, 8:33 AM IST

तिन्ही आरोपी 26 जुलै 2017 रोजी पहाटे तीन वाजता केगाव-देगाव रोडवरून विदेशी दारूची अवैधरित्या तस्करी करणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने सापळा लावला होता. तिन्ही आरोपी केगाव-देगाव रोडवर एका आयशर वाहनातून दोन पीकअप वाहनात दारूचे बॉक्स ठेवत होते. राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब तिन्ही आरोपींना रंगेहात जाग्यावरच पकडले होते

तिघांना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

सोलापूर- दारूबंदी कायद्यांतर्गत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी.मोहिते यांनी तीन आरोपींना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. तसेच तीन हजार रुपयांच्या दंडही ठोठावला आहे. 26 जुलै 2017 च्या पहाटे तीन वाजता तिन्ही आरोपी हे सोलापूर येथील देगाव रोडवर विदेशी दारूची तस्करी करताना आढळले होते. सोमनाथ तुकाराम भोसले(वय 32 वर्ष), समाधान तुकाराम भोसले(वय 28 वर्ष,दोघे रा.खवणी, ता.मोहोळ,जि सोलापूर), अविनाश दिगंबर डोंगरे(वय 23 वर्ष,रा आडेगाव ,ता.मोहोळ,जि सोलापूर) असे तिन्ही आरोपींचे नाव आहेत.

तिघांना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

विदेशी दारूची तस्करी करताना आढळले होते आरोपी-

समाधान भोसले, सोमनाथ भोसले, अविनाश डोंगरे हे तिन्ही आरोपी 26 जुलै 2017 रोजी पहाटे तीन वाजता केगाव-देगाव रोडवरून विदेशी दारूची अवैधरित्या तस्करी करणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने सापळा लावला होता. तिन्ही आरोपी केगाव-देगाव रोडवर एका आयशर वाहनातून दोन पीकअप वाहनात दारूचे बॉक्स ठेवत होते. राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब तिन्ही आरोपींना रंगेहात जाग्यावरच पकडले आणि दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली शिक्षा-

राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी संतोष पवार यांच्या कोर्टात दोषारोप पत्र दाखल केले होते. या केसची सुनावणी होऊन तपास अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल सादर केला होता. चौकशीअंती 21 फेब्रुवारी 2018 ला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी संतोष पवार यांनी तिन्ही आरोपींना तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती. आरोपींच्या वकिलांनी 23 फेब्रुवारी 2018 रोजी या निर्णयाला आवाहन देत जिल्हा व सत्र न्यायालयात अपील केले होते. जिल्हा व सत्र न्यायालयाने सदर खटल्याची संपूर्ण सुनावणी घेत पुन्हा एकदा चौकशी केली.त्यांनतर जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही जी मोहिते यांनी तिन्ही आरोपींना तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड ही शिक्षा शिक्षा कायम ठेवली आहे.

अवैध बनावट दारूचा गुन्हा दाखल होता-
जुलै 2017 रोजी केगाव देगाव रोडवर राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान होळकर यांनी तक्रार दाखल केली होती. अवैध विदेशी बनावट दारू बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तपास अधिकारी म्हणून दुय्यम निरीक्षक प्रशांत निकाळजे यांनी काम पाहिले. या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. दोन्ही कोर्टात तिन्ही आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सदर खटल्यात सरकार तर्फे अॅड शितल डोके व आरोपी तर्फे अॅड महेश जगताप यांनी काम पाहिले.

Last Updated : Mar 13, 2021, 8:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details