सोलापूर - शहरात चोऱ्या व दरोड्याच्या घटनांत वाढ झाली आहे. अशीच एक घटना शहरातील गंगाधर नगर येथे राहत असलेल्या एका प्राध्यापकाच्या घरी घडली आहे. समीर लालासाहेब बिराजदार असे या प्राध्यापकाचे नाव आहे. यावेळी चोरांनी त्यांचे हातपाय बांधले होते. दरम्यान चोरांनी 1 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल घेत घटनास्थळावरून पोबारा केला.
उदयसिंह पाटील यांची प्रतिक्रिया ओढणीने बांधले हातपाय -
समीर बिराजदार हे 21 डिसेंबर रोजी रात्री 9 च्या सुमारास जेवण करून झोपी गेले. 22 डिसेंबरच्या मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास अज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी त्यांच्या बेडरूमची कडी तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी समीर बिराजदार व त्यांच्या पत्नीचे हातपाय ओढणीने बांधून दमदाटी केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर लाकडी कपाट उघडून सोन्याचांदीचा ऐवज तसेच त्यांच्या पत्नीच्या अंगावरील दागिने देखील काढून घेतले.
चोरीच्या घटनांमध्ये वाढ -
विजापुर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुळे सोलापूर, बिलाल नगर, अत्तार नगर, मोहिते नगर, आसरा सोसायटी, मंत्री चांडक आदी उचभ्रू सोसायट्या आहेत. या पोलीस ठाण्यात दोन ते तीन पोलीस निरीक्षकांची गरज असताना फक्त एकाच पोलीस निरीक्षकाच्या खांद्यावर बोझा लादला आहे. यामुळे पोलीस आयुक्त यांचा मनमानी कारभार समोर येत आहे. शहरातील उचभ्रू वसाहतीमध्ये दरोडे आणि चोऱ्यांच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - बॉक्सिंग डे कसोटी : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, वॉर्नरसोबत 'हा' खेळाडू संघातून बाहेर!