पंढरपूर (सोलापूर) -मराठा आरक्षणासाठी पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडी आक्रोश मोर्चाची सुरुवात शनिवारी (दि. 7 नोव्हेंबर) पंढरपूर येथील नामदेव पायरी येथून होणार होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी 6 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपासून 7 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत पंढरपुरात संचार बंदीचे आंदेश दिले आहे. यामुळे मराठा समाजा आणखी आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात 7 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी - pandharpur news
मराठा समाज आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थिगिती उठवावी यासह अन्य मागणीसाठी पंढरपूर ते मंत्रालय, अशी दिंडी काढण्यात येणार होती. मात्र, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी यासह अन्य मागण्यांसाठी राज्य सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पंढरपूर ते मंत्रालय, असा वीस दिवसांचा पायी दिंडी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, पंढरपूर येथे 6 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत. या संचारबंदीच्या काळात एसटी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. पंढरपुरात नामदेव पायरी, विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा घाट, प्रदक्षणा मार्ग ते चौफाळा या भागात मोठा पोलीस बंदोबस्त असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -मंगळवेढा तालुक्यात शेततळ्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू