सोलापूर - सोलापुरात आज कोरोना प्रतिबंधक लस पोहोचणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिली. सोलापूर शहर व जिल्ह्यातील 16 केंद्रावर त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आज दत्ता भरणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी कोरोना लस आणि बर्ड फ्ल्यू यावर माहिती देत माध्यमांशी संवाद साधला.
34 हजार जणांना कोरोना लसीकरण केले जाणार
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला कोरोना लसीकरणची व्यवस्था केली आहे. यामध्ये माळशिरस तालुक्यात मात्र दोन ठिकाणी याची व्यवस्था केली आहे. शहर व जिल्हा असे मिळून 16 ठिकाणी कोरोना लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज 100 जणांना लसीकरण केले जाणार आहे.पहिल्या टप्प्यात 34 हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांना व कोरोना वारीयर याना लस टोचली जाणार आहे.ही लस 2 ते 8 अंश सेल्सिअस मध्ये ठेवली जाणार आहे.