महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या 275 वर; 17 जणांचा मृत्यू - सोलापूर कोरोना अपडेट

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवारी दिवसभरात ११ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 11 ने वाढून 275 इतकी झाली आहे.

Corona positive
कोरोना पॉझिटिव्ह

By

Published : May 12, 2020, 9:45 AM IST

Updated : May 12, 2020, 10:04 AM IST

सोलापूर- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 11 ने वाढून 275 इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या 17 पर्यंत पोहोचली आहे. जिल्हा प्रशासनाने प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. आत्तापर्यंत सोलापुरात 3 हजार 200 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. यातील 3 हजार 98 अहवाल प्राप्त झाले असून 2 हजार 823 निगेटिव्ह तर 275 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

सोमवारी एका दिवसात 126 अहवाल प्राप्त झाले यापैकी 115 निगेटिव्ह तर 11 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यात 6 पुरूष आणि 5 महिलांचा समावेश आहे. आज मिळालेल्या रुग्णांमध्ये एकता नगर, महालक्ष्मी नगर एमआयडीसी, सदर बझार लष्कर, बुधवार पेठ, हुडको कॉलनी, किसान संकुल, जवाहर नगर, पाच्छा पेठ, मिलिंद नगर, कुमठा नाका, रंगभवन येथील नागरिकांचा समावेश आहे. आत्तापर्यंत बरे झालेल्या 41 जणांची रूग्णालयातून सुटका झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

कोरोनाचा आढावा घेताना जिल्हाधिकारी
Last Updated : May 12, 2020, 10:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details