सोलापूर- हिंदू संस्कृतीत कावळ्याला महत्त्वाचे स्थान आहे. जेव्हा पिंडदान असते तेव्हाच या कावळ्यांची प्रेमाने वाट सर्व जण पाहतात. पण, इतरवेळी त्यांना कणकण भर अन्नासाठी भटकंती करावी लागत असते. ही जाणीव मनी ठेऊन माढ्यातील अर्जुन अनिल भांगे हे हॉटेल व्यावसायीक दररोज कावळ्याची भुक भागवत आहेत.
त्यांच्या या कामामुळे त्यांना शहरासह पंचक्रोशित लोक 'कावळे मामा' या नावाने संबोधतात. ते दररोज नव्वद ते शंभर कावळ्यांना एक किलो फरसाणा त्या सोबतच चिवडा, शेंगदाण्याचे अन्नदान करुनच आपल्या व्यवसायाची सुरूवात करतात. गेल्या वर्ष भरापासून ते कावळ्यांचे जणू दोस्तच बनले आहेत.