महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शहरात तीन ठिकाणी गुन्हे शाखेचा छापा, गावठी दारूसह पाच जण अटकेत - सोलापूर पोलीस बातमी

सोलापूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने शहरात विविध तीन ठिकाणी छापा मारत हातभट्टीची दारू जप्त केली आहे.

आरोपी
आरोपी

By

Published : May 27, 2021, 7:40 PM IST

सोलापूर- कडक निर्बंधातही अवैध धंदे जोमात सुरू आहेत. सोलापूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने शहरातील तीन ठिकाणी छापा मारुन हातभट्टीची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. गुन्हे शाखेने या कारवाईत गावठी दारूने भरलेले ट्युब , रिक्षा ,असा मुद्देमाल जप्त केला आहे. एमआयडीसी पोलीस ठाणे, सदर बझार पोलीस ठाणे आणि सलगर वस्ती पोलीस ठाणे या पोलीस ठाण्याचा हद्दीत या कारवाया करण्यात आल्या आहेत.

पहिली कारवाई

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टी दारू विक्रीसाठी जात होती. एका रिक्षामध्ये ही दारू घेऊन जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रिक्षाचा शोध घेऊन त्याचा पाठलाग करून गावठी दारूसह रिक्षा जप्त केली. तसेच नागार्जुन दत्तात्रय गजम (रा. भवानी पेठ, सोलापूर), लक्ष्मीकांत नरसप्पा गुजे (रा. भवानी पेठ, सोलापूर), दिनेश अनिल कांबळे (रा. शेळगी, सोलापूर) या तिघांना अटक केली आहे. या कारवाई रिक्षा, 600 लिटर दारू, असा 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दारू तयार करणारा मुख्य संशयीत आरोपीचा शोध सुरू आहे.

दुसरी कारवाई

सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत होम मैदानजवळ रहमतबी टेकडी येथे लिंबाच्या झाडाखाली अवैधरित्या हातभट्टी दारू विकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे. संतोष बाळू भोसले (वय 45 वर्षे, रा. भवानी पेठ सोलापूर), असे संशयीत आरोपीचे नाव आहे. संतोषकडून एकूण 30 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे.

तिसरी कारवाई

सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मोकळ्या जागेत झाडाखाली अवैधरित्या गावठी दारू विक्री करणाऱ्यावर गुन्हे शाखेने कारवाई करून गावठी दारू जप्त केली आहे. या कारवाई नेताजी वसंत देवकर (रा. रामवाडी, सोलापूर) याला अटक केली आहे. नेताजीकडून 40 लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे.

हेही वाचा -सोलापुरातील कामगारांनी काळे झेंडे घरावर लावून केंद्र सराकरचा केला निषेध

ABOUT THE AUTHOR

...view details