सोलापूर - येथील बार्शी शहरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनोखे असे 'बुड बुड घागरी' आंदोलन केले आहे. बार्शी तालुका पोलीस स्टेशनमधील अनियमित आणि ढिसाळ कारभार सुरू असल्याचा आरोप करत काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले आहे.
बार्शीत पोलिसांच्या विरोधात 'बुड बुड घागरी' आंदोलन - बार्शी पोलीस स्टेशन
बार्शी पोलीस स्टेशनच्या ढिसाळ कामकाजाबाबत बुडबुड आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला.
आंदोलनकर्ते कॉंग्रेसचे कार्यकर्ते
काय आहे 'बुड बुड घागरी' आंदोलन -
इसापनीतीमधील ही एक गोष्ट आहे. ज्यामध्ये खोटे बोलून भ्रष्टाचार करतो आणि एखाद्याला फसवतो, किंवा दिलेल्या जबाबदारीचे पालन करत नाही, अशा लोकांची घागर नक्की बुडते.