सोलापूर - लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यासह देशभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सध्या माढा लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे निवडणूक लढवणार आहेत. तर आता त्यांच्याविरोधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. राजू शेट्टींनी हातकलंगणे मतदारसंघासह माढ्यातून निवडणूक लढवण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तालुक्यातील वेळापूर येथे कार्यकर्त्यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राजू शेट्टींनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा ठराव पारीत करण्यात आला आहे. हे स्वाभिमानीचे काँग्रेससह राष्ट्रवादीवर दबाबतंत्र असल्याचे बोलले जात आहे.
आम्हाला गृहीत धरु नये, फरफपट कोणाच्याही मागे जाणार नाही - तुपकर
आम्ही सन्मानाने आघाडीत जाण्यास तयार आहोत. मात्र, जर आमचा योग्य सन्मान होणार नसेल तर आम्ही कोणाच्याही मागे फरफटत जाणार नसल्याचे वक्तव्य स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले. हातकलंगणे, बुलडाणा आणि वर्धा या तीन मतदारसंघासाठी आम्ही आग्रही आहोत. मात्र, यावर जर निर्णय नाही झाला तर आम्ही स्वबळावर ९ ठिकाणी आमचे उमेदवार उभे करणार असल्याचे तुपकर यांनी सांगितले. पुण्यात होणाऱ्या कार्यकारणीच्या बैठकीत राजू शेट्टींच्या उमेदवारीचा ठराव मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवारांशी चर्चा