महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हत्येच्या केवळ 48 तासांत ग्रामीण पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या - सोलापूर गुन्हे बातमी

करमाळा तालुक्यातील वीट गावात 17 फेब्रुवारीला एका महिलेचा निर्घृण खून झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी केवळ 48 तासांत संशयिताच्या मुसक्या आवळण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

आरोपीसह पोलीस
आरोपीसह पोलीस

By

Published : Feb 20, 2021, 7:38 PM IST

सोलापूर -करमाळा तालुक्यातील वीट गावात 17 फेब्रुवारीला एका महिलेचा निर्घृण खून झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी केवळ 48 तासांत संशयिताच्या मुसक्या आवळण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. धनाजी गाडे (वय 27 वर्षे, रा. वीट, ता. करमाळा, जि. सोलापूर), असे संशयित आरोपीचे नाव आहे.

माहिती देताना पोलीस अधीक्षक

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, वीट गावातील एका महिलेसह धनाजी गाडेचे अनैतिक संबंध होते. काही दिवसांपासून ती महिला धनाजीकडे सतत पैशाची मागणी करत होती. त्यामुळे चिडलेल्या धनाजीने त्या महिलेला शेतात जाताना गाठले व दगडाने तिचे डोके ठेचले. त्या महिलेचे मेंदू डोक्याच्या बाहेर येईपर्यंत धनाजी हा दगडाने त्या महिलेच्या डोक्यात प्रहार करत होता. ती ठार झाल्याचे लक्षात येताच धनाजीने घटनास्थळावरून पळ काढला.

'असा' लावला गुन्ह्याच्या छडा

शेतातील झुडपात एका महिलेचा निर्घृण खून झाल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला. तपास करत असताना अनेक पुरुषांवर पोलिसांचा संशाय होता. काही दिवसांपूर्वी त्या महिलेशी धनाजी गाडेचे वाद झाले होते. या आधारावर पोलिसांनी धनाजीला ताब्यात घेत विचारपूस केली. मात्र, तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार करत खरी माहिती बाहेर काढली.

बलात्काराचाही गुन्हा होऊ शकतो दाखल

त्या महिलेचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत आढळला होता. धनाजीने तिचा खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वैद्यकीय अहवालात बलात्कार झाल्याने निष्पन्न झाल्यास संशयितावर खूनासह बलात्काराचाही गुन्हा दाखल होऊ शकतो.

हेही वाचा -चारचाकी गाडी ओढत नेत काँग्रेसने केला इंधन दरवाढीचा निषेध

ABOUT THE AUTHOR

...view details