सोलापूर- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसडकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत ही उमेदवारी अर्ज दाखल केला.
शक्तीप्रदर्शन करत सुशीलकुमार शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल - Solapur
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसडकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
सुशीलकुमार शिंदे यांनी दिवसाची सुरुवात शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून केली. त्यानंतर ४ पुतळा परिसरातून भव्य रॅलीने ते पार्क चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाले. ढोल-ताशे, तिरंगी, गुलाबी, पिवळे आणि निळे झेंडे घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. या रॅलीत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासमवेत पत्नी उज्वला, मुलगी आमदार प्रणिती, स्मृती यांच्यासह सर्व काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.