महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर लोकसभेसाठी सुशिलकुमार शिंदेसह प्रकाश आंबेडकर आणि डॉ. जयसिद्धयेश्वर महास्वामी यांचे अर्ज दाखल - prakash Aambedakr

सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपकडून डॉ. जयसिद्धयेश्वर महास्वामी तर  वंचित बहुजन आघाडीकडून  प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

By

Published : Mar 25, 2019, 5:54 PM IST

सोलापूर - लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातही राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपकडून डॉ. जयसिद्धयेश्वर महास्वामी तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

२०१४ साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा भाजपचे उमेदवार शरद बनसोडे यांनी पराभव केला. मात्र, यावेळेस भाजपने शरद बनसोडेंना उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्या जागी भाजपने डॉ. जयसिद्धयेश्वर महास्वामी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. तर यावेळेस वंचित बहुजन आघाडीकडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याने रंगत वाढली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details