सोलापूर- पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत जिल्ह्यातील सुर्डी गावाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्यानिमित्ताने गावातील नागरिकांनी मिळालेल्या पारितोषिकाची गावातून ढोलताशा, हलगीच्या गजरात गुलालाची उधळण करीत डॉल्बीच्या तालात मिरवणूक काढून जल्लोष केला.
पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा ; सोलापुरातील सुर्डी गाव राज्यात प्रथम - water cup compitition
पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत जिल्ह्यातील सुर्डी गावाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्यानिमित्ताने गावातील नागरीकांनी वॉटर कपची गावातुन ढोलीबाजा, हालगीच्या कडकडात गुलालाची उघळण करीत डॉल्बीच्या तालात मिरवणुक काढुन जल्लोष केला.
रायगड विभागाचे आत्मा प्रकल्प अधिकारी मदन मुकणे, भागाईवाडीच्या सरपंच कविता घोडके-पाटील यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. सर्वांनी ध्येयाने काम केल्यामुळे यश मिळाले, असे पाणी फाउंडेशनचे मार्गदर्शक मधुकर डोईफोडे यांनी यावेळी सांगितले. तर डोईफोडे यांनी सर्वांना एकत्र घेऊन काम केल्यामुळे हे यश गावाला मिळाले, अशी भावना प्रत्येक नागरिक अभिमानाने सांगत होता.
यावेळी मदन मुकने व भागाईवाडी पाणी फाउंडेशनचे व्यवस्थापन समितीचे लहू घोडके यांनी सुर्डी गावात झालेले काम राज्यातील प्रत्येक गावासाठी प्रेरणादायी आहे. आणि महाराष्ट्र दुष्काळ व पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी सहभागी होण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच सुजाता धनाजी डोईफोडे, तालुक्याचे समन्वयक आदिक जगदाळे, नितीन आतकरे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.