सोलापूर - मंत्रालयामध्ये सहसचिव पदावर कार्यरत असलेल्या विजयकुमार पवार यांनी पत्नीवर गोळ्या झाडून स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मंगळवेढा तालुक्यातील मरवडे या त्यांच्या मूळ गावी ही घटना घडली. पवार व त्यांची पत्नी सोनाली यांच्यात घरगुती वाद झाला होता. या वादातून त्यांनी पत्नीवर २ गोळ्या झाडल्या. जखमी अवस्थेत पत्नीला सोलापुरातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
धक्कादायक.. पत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालय सचिवाची आत्महत्या, मंगळवेढ्यातील घटना - mangalwedha
विजयकुमार पवार हे मूळचे मंगळवेढा तालुक्यातील मरवडीचे रहिवासी आहेत. सध्या ते मुंबईत मंत्रालयात सहसचिव पदावर काम करत आहेत. यापूर्वी पवार यांनी नंदुरबार येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
विजयकुमार पवार हे मूळचे मंगळवेढा तालुक्यातील मरवडीचे रहिवासी आहेत. सध्या ते मुंबईत मंत्रालयात सहसचिव पदावर काम करत आहेत. यापूर्वी पवार यांनी नंदुरबार येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. विजयकुमार पवार हे मूळ गावी मरवडी येथे आले असता त्यांची पत्नी सोनाली पवार हिच्याशी त्यांचा वाद झाला. वादामुळे रागाच्या भरात विजयकुमार पवार यांनी त्यांची पत्नी सोनाली हिच्यावर गोळ्या झाडल्या आणि स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
गोळीबारामध्ये सोनाली पवार या जखमी झाल्या. त्यांना सोलापुरातील रुग्णालयात हलविण्यात आले आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सोनाली पवार यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असून त्यांच्यावर सोलापुरात उपचार सुरू आहेत. हा सर्व प्रकार मंगळवेढा तालुक्यातील मरवडे या गावांमध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला.