महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सहकार, समाजकारणातील मार्गदर्शक नेतृत्व हरपले : मुख्यमंत्री ठाकरे

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक (वय 84) यांचे कोरोनामुळे निधन झाले. पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर प्रशासनाच्या नियमानुसार अंतिम संस्कार करण्यात आले. पंत यांच्या निधनावर राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

सुधाकर पंत परिचारक यांचे निधन
सुधाकर पंत परिचारक यांचे निधन

By

Published : Aug 18, 2020, 6:16 PM IST

पंढरपूर (सोलापूर) -सहकार, शिक्षण क्षेत्रातील कामाने समाजकारणात आणि जनतेत आदराचे स्थान मिळविलेले ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली आहे.

ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले. तर माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाने सहकार, कृषी, शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणारे जेष्ठ नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आदरांजली अर्पण केली.

पंढरपुर तालुक्याच्या राजकारण, साखर कारखाना, सूत गिरणी अशा विविध सहकारी संस्थांवर पदे भूषिवलेल्या, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक (वय 84) यांचे कोरोनामुळे निधन झाले. पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर प्रशासनाच्या नियमानुसार अंतिम संस्कार करण्यात आले.

पंढरपूर येथील प्रदक्षिणा मार्गावरील परिचारक वाडयासमोर सुधाकरपंत परिचारक यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. यावेळी सामाजिक, राजकीय, शिक्षण, सहकार क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेस फुले अर्पण करून आदरांजली वहिली. आज पंढरपुरातील व्यापाऱ्यांकडून बंद पाळण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details