महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूरमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद कंपनी स्थापन करावी - सुभाष देशमुख

सोलापूर येथे राज्य राखीव पोलीस बल गटाचे मुख्यालय आहे. त्यामुळे प्रशिक्षणासाठीही जागा उपलब्ध होईल, यासाठीचा प्रस्ताव विभागाने मंत्रिमंडळासमोर ठेवावा, अशा सूचना सुभाष देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सोलापूरमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद कंपनी स्थापन करावी - सुभाष देशमुख

By

Published : Jul 3, 2019, 10:17 PM IST

सोलापूर- राज्यात नागपूर आणि धुळे येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल कार्यरत आहे. सोलापूर येथे नवीन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची कंपनी स्थापन करण्यात यावी. सोलापूर येथे राज्य राखीव पोलीस बल गटाचे मुख्यालय आहे. त्यामुळे प्रशिक्षणासाठीही जागा उपलब्ध होईल, यासाठीचा प्रस्ताव विभागाने मंत्रिमंडळासमोर ठेवावा, अशा सूचना सुभाष देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

या अंतर्गतची पदे ही महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या आस्थापनेवर निर्माण करण्यात येणार आहेत. बुधवारी मंत्रालयात महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी या सूचना दिल्या.

२०१९ चा अद्ययावत राज्य आपत्ती व्यवस्था आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात दुष्काळ सौम्यीकरण उपाययोजनांचा समावेश करण्यात आला असून त्याचा पुढील वर्षी जिल्ह्याच्या आराखड्यात समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य आपत्ती आणि जिल्हा आपत्ती या दोन्ही व्यवस्थापन आराखड्यास आज मान्यता देण्यात आली, असे देशमुख यांनी सांगितले.

पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यास अडकलेल्या लोकांना पूरपरिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी काही जिल्ह्यात अद्ययावत बोटी व बचाव साहित्याची गरज आहे. राज्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलामार्फत (NDRF) शोध व बचावाचे काम करण्यात येते. परंतु, ही यंत्रणा आपत्तीच्या ठिकाणी पोहचेपर्यंत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तत्काळ प्रतिसाद देत असते. हा प्रतिसाद अंत्यत महत्त्वाचा असतो. यासाठी आधुनिक साधन सामुग्री असलेल्या बोटी व शोध, बचाव साहित्याची मागणी असलेल्या जिल्ह्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून ते लवकरच देण्यात यावेत, असेही सुभाष देशमुख यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details