पंढरपूर -मंगळवारी आषाढ देवशयनी एकादशी साजरी केली जात आहे. या निमित्ताने पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर गुलाब, ऑर्किड्स, एनथोरीयम, जरबेरा फुलांनी सजविण्यात आले आहे. गाभाऱ्यात फुलांची आरास केल्याने विठ्ठलाच्या या रुपाला पाहून मन अगदी प्रसन्न झाल्याचे वातावरण मंदिरात तयार झाले.
विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याला आरास तयार करण्यासाठी 50 हजार फुलांचा वापर करण्यात आले. ही आरास पुणे येथील विठ्ठल भक्त भारत शेठ भुजबळ यांनी भक्त सेवेतून केली. कोरोना संसर्गामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन मंदिरात जाऊन भाविकांना घेता येत नसले तरी विविध माध्यमातून आपणही देवाचे मनमोहक रूप घर बसल्या पाहू शकतो. विठ्ठल मंदिराचा गाभारा, सोळखांबी, सभामंडप व नामदेव पायरी भागामध्ये फुलांची आरास करण्यात आली.
हेही वाचा-11th CET exam 21 ऑगस्टला होणार; आजपासून नोंदणी सुरू