सोलापूर- पारधी समाज आणि पोलीस यांच्यातील संबंध सुधारावेत यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांच्यावतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पारधी समाजातील तरुणांनी शिक्षणाकडे वळावे तसेच पारधी समाजासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती या कार्यशाळेत देऊन 10 आणि 12 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सोलापूर ग्रामीण पोलिसांची पारधी समाजासाठी कार्यशाळा माळशिरस तालुक्यातील पारधी समाजासाठी विशेष अशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अकलूज येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत जवळपास 500 पारधी समाजातील लोक उपस्थित होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पारधी समाज आणि पोलीस यांच्यातील संबंध सुधारावेत यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांच्यावतीने कार्यशाळेचे आयोजन पारधी समाजातील लोक आणि पोलिसांमध्ये सुसंवाद वाढावा यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पोलीस भरती, होमगार्ड भरती, शासकीय योजना, शैक्षणिक सवलती, नोकरीतील सवलती, घरकूल योजना यासह शासनाच्या विविध योजनांची माहिती पारधी समाजातील लोकांना देण्यात आली. पारधी समाजासाठी असलेल्या या योजनांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा या बद्दलचे मार्गदर्शन देखील यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले.
अडचणी सोडवण्यासाठी समाजासाठी असलेल्या विविध योजनांशी संबंधीत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन व मोबाईल नंबर यावेळी देण्यात आले. पारधी समाजाला गून्हेगारीपासून परावृत्त करून समाजाच्या मूख्य प्रवाहात आणण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.